भोकर विधानसभा मतदार संघातील अधिकाऱ्यांना मतदानाचे प्रशिक्षण संपन्न

भोकर : (माधव मेकेवाड) पोलीसनामा ऑनलाइन – आज दिनांक ०७ एप्रिल २०१९ रोजी ओम लॉन्स, भोकर इथे मतदान अधिकारी यांचे करिता द्वितीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदारील प्रशिक्षण मध्ये पवन चांडक (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ८५-भोकर तथा उपविभागीय अधिकारी भोकर) यांनी व भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर) यांनी मार्गदर्शन केले आहे. सदरील प्रशिक्षणास एकूण ७५२ इतके मतदान अधिकारी (मतदान केंद्राअध्यक्ष-३७५ व सहाय्यक-३७७) उपस्थित होते.

सदरील प्रशिक्षण ठिकाणी दिनेश झांपले (तहसीलदार मुदखेड) यांचे निगराणी मध्ये मतदान अधिकारी यांचे करिता टपाली मतदान करुन घेण्यात आले आहे. तसेच सदरील प्रशिक्षण ठिकाणी चव्हाण (शिक्षक, नारवट), नरेंद्र मडगुलवार व टिम भोकर यांचेद्वारे मतदान केंद्रावरील पूर्ण प्रक्रिया व विविध प्रकारचे मतदार कसे येतात याबाबत पथनाट्य स्वरुपात सादरीकरण करुन दाखविण्यात आले.

या पथनाट्य मध्ये श्री. राजू चव्हाण, राजकुमार मस्के, वैभव डांगे, सुभाष जगताप, ज्योती राठोड, शिला घोरपडे, सुरकर सर, घोळक सर, राहुल कदम, राम मुनंगे, योगेश गोरठकर, दत्ता चंचलवाड, सुरेश माने यांनी सहभाग नोंदविला आहे व तसेच सामाजिक न्याय भवन, मुलांचे वसतिगृह, किनवट रोड भोकर या ठिकाणी झोन निहाय व ३ बॅच निहाय १२ हॉल प्रमाणे झोनल अधिकारी यांचे मार्फत प्रत्येक मतदान अधिकारी यांचेकडून इ व्ही एम व व्ही व्ही पॅट चे प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले आहे.
दोन्ही ठिकाणच्या प्रशिक्षण करिता आवश्यक ते नियोजन मारोतराव जगताप (नायब तहसीलदार भोकर)व टिम यांनी नियोजन केले होते.