4 मित्रांमध्ये भांडण, एकाचा खून

औरंगाबद : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षात बसण्यावरून चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एका मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मोहम्मद असिफ असे मृत तरुणाचे नाव असून तो शहरातील एस. टी. कॉलनी येथे राहणारा होता. असिफच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून सिडको ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद असिफ याने आईला मित्रांसोबत अंबड येथील रौनापरांडा येथे तंदुरी खाण्यासाठी जायाचे आहे असं सांगितलं होतं. रात्री 11 वाजताच्या सुमारास मित्राचा फोन आल्यानंतर तो घराबाहेर पडला होता. त्याच्यासोबत त्याचे मित्र शेख रेहान शेख पाशू सोहेल, ईब्राहीम रिक्क्षात निघाले. मात्र रिक्षा चालक वसीम आणि शेख रेहान यांच्यात रिक्षात मागे-पुढे बसण्याच्या कारणावरून वाद झाला. वाद एवढा टोकाला गेला की शेख रेहान शेख पाशु याने त्याचे कडील धारदार शस्त्राने असिफवर वार केले. यात असिफचा जागीच मृत्यू झाला.

शुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येनंतर काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. या प्रकरणी सिडको पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like