नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

अहमदनगर न्यूज (Ahmednagar News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अहमदनगर महापालिकेत ( Ahmednagar Municipal Corporation) आज महापौर (Mayor) आणि उपमहापौरपदा (Deputy Mayor) ची निवडणुक (Election) होत आहे. येथे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ची सत्ता येणार आहे. शिवसेने (Shiv Sena) चा महापौर आणि राष्ट्रवादी (NCP) चा उपमहापौर अशी निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर रात्री शिवसेनेच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. नगरसेविके () चे पती निलेश भांगरे यांनी आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांनी मारहाण केल्याचा आरोप निलेश भांगरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आरोप करण्यात आलेल्या या दोघांच्याही पत्नी यापूर्वी महापौर झाल्या होत्या.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

निलेश भांगरे यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्यासमोर आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले आहे.
या व्हिडिओत ते म्हणतात की, मुख्यमंत्र्यांच्या दारात मी माघार घेतली होती.
अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांनी आपल्याला दिवसभर दारु पाजली.
आमच्या बोलणे सुरु असताना वाद झाला होता.
त्यामुळे दोघांनी मला बेदम मारहाण केली.
जातीवरुन शिव्या दिल्या, असे निलेश भांगरे यांनी म्हटले आहे.

नगरमध्ये आज ऑनलाईन पद्धतीने महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यात येणार आहे.
यापूर्वी नगर महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र होते.
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे नगरमध्ये महापौरपदाची निवडणुक ही महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचा निर्णय झाला आहे. महापौरपद मिळत असतानाच शिवसेनेच्या दोन गटातील हाणामारीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : ‘Conflict’ in Shiv Sena even before the election of mayor and
deputy mayor in the city! Violent fighting between the two groups

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर