हॉटेलवर अतिक्रमण कारवाईचा विरोध करत ‘दादांची’ टॉवरवर चढून ‘गांधीगिरी’ 

बारामती : पोलिसनामा ऑनलाईन – बारामती शहरातील भिगवण रस्त्यालगत असणाऱ्या मोबाईल टॉवरवर एक हॉटेल व्यवसायिक शोले स्टाईल चढुन बसला आहे. या घटनेनेन सर्वच बारामतीकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील इतर अतिक्रमनाकाडे दुर्लक्ष करुन आपल्यावरच जाणुनबुजुन कारवाई केल्याचा आरोप या युवकाने करीत टॉवरवर चढुन आंदोलन सुुरु केले आहे. प्रशांत दादा सरतापे असे या युवकाचे नाव असून. शिवाजी चौकात गणेश हे त्याचे हॉटेल आहे.

का केले त्याने असे सिनेस्टाइल आंदोलन?….
काही दिवसांपुर्वी नगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. यावेळी सरतापे यांच्या हॉटेलवर देखील कारवाई करण्यात आली. मात्र, शहरात इतर अतिक्रमणांकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असुन मला जाणुनबुजुन त्रास दिला जात असल्याचा आरोप करत सरतापे हा युवक आज सकाळी १० वाजता सिनेस्टाइल मोबाईलच्या टॉवरवर चढुन बसला. नगरपालिकेसह पोलीस प्रशासनाने हॉटेलवरील कारवाई मागे घ्यावी, शहरातील इतर अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशा मागण्या करत त्या युवकाने टॉवरवर चढुन आंदोलन सुरु केले. मागण्या मान्य न झाल्यास टॉवर वरुन उडी मारण्याचा इशारा देखील या युवकाने दिला दुपारी उशिरापर्यंत हा युवक मनोऱ्यावरुन खाली न उतरण्याच्या भुमिकेवर ठाम होता.

प्रशासनाची उडाली धावपळ…

या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाबरोबरच नगरपालिका प्रशासनाची देखील धावपळ उडाली आहे . सहायक पोलीस निरीक्षक निलेश अपसुंदे, बारामती नगरपालिका प्रशासनाने आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुनील धुमा, महेश आगवणे आदी कर्मचारी तत्काळ या ठीकाणी पोहचले. सर्वांनी या युवकाला खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र, युवकाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय खाली उतरणार नाही असा पवित्रा घेतला.

महापालिका प्रशासनाला अखेर द्यावे लागले लेखी पत्र….

या प्रकारानंतर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी विजय थोरात यांच्या स्वाक्षरीचे पत्र मागविण्यात आले. त्या पत्राची प्रिंट युवकाच्या आईच्या स्वाधीन करण्यात आली. या युवकाला मोबाईलवर लेखी पत्र देखील वाचुन दाखविण्यात आले. शहरातील विविध अतिक्रमणे काढणेबाबत नगरपालिका नियमानुसार कारवाई करेल. घरपट्टी आकारणीबाबत नगरपरिषद नियमबध्द कार्यवाही करत आहे. कृपया आपण टॉवरवरुन उतरुन आंदोलन रद्द करावे, ही विनंती,असे या पात्रात नमूद केले होते.