‘या’ एकाच मतदार संघात भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यामुळं संभ्रम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप पाठोपाठ शिवसेनेने देखील विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने 125 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आता शिवसेनेने 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. इचलकरंजी मतदारसंघातून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या यादीत अनुक्रमांक 48 नुसार इचलकरंजी मतदारसंघातून हातकणंगलेचे आमदार सुजित मिनचेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, भाजपाच्या यादीत अनुक्रमांक 121, मतदारसंघ क्रमांक 279 मध्ये इचलकरंजीतून सुरेश हळवणकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र हे टायपिंग मिस्टेकमुळे घडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असून हा मतदारसंघ भाजपालाच देण्यात आला आहे. तर हातकणंगले येथून सुजित मिनचेकर यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेनेही 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मोठे अनपेक्षित बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, काही जागांवर वाद सुरु असल्याने त्या जागांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे, बीडमधून जयदत्त क्षीरसागर आणि नालासोपाऱ्यातून प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com