ओएलएक्सवर गाडी विकण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा कांगो नागरिक गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ओएलएक्सवर कार विक्रीची जाहीरात टाकून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कांगो नागरिकाला सायबर क्राईम सेलच्या पथकाने गजाआड केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला बेंगलोर येथून अटक करण्यात आली नॅनगुईले किशी पेशंट (रा. बेंगलोर, कर्नाटक मुळ रा. कांगो) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
[amazon_link asins=’B0789G2XWZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a0263f7-8c1c-11e8-bb9f-452667857481′]

आरोपीने ओएलएक्सवर इर्टीका कार विक्रीची जाहिरात टाकली होती. ही जाहिरात वाचून हिंजवडी येथील एका व्यक्तीने ओएलएक्सवर इर्टीका गाडी खरेदीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबईल नंबरवर संपर्क साधला. मोबाईल धारकाने २ लाख ७७ हजार ४०० रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर कार मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. त्याच्या सांगण्यानुसार बँक खात्यात पैसे भरले. पैसे भरुन देखील कार न मिळाल्याने  फसवणूकीचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तसेच सायबर सेलकडे तक्रार दिली.

पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने संबंधित मोबाईल कंपनी व बँक यांना पत्रव्यवहार करुन त्यांचेकडून माहिती घेतली. मोबाईल नंबर व बँकेकडून मिळालेल्या माहितीचा तांत्रिक अभ्यास करुन आरोपी बेंगलोर येथे असल्याचे निष्पन्न झाले. सायबर क्राईम सेलचे एक पथक बेंगलोर येथे पाठवून आरोपीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सात मोबाईल, पेनड्राईव्ह, हार्डडिक्स व साडेनऊ हजार रुपयांची रोकड जप्त केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीकडून पुणे शहर व राज्यातील अनेक लोकांची अशा प्रकारे फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’81bf4a08-8c1c-11e8-9036-57cbb0f6f30c’]

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पुणे शहरातील नागरिकांनी ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवरील जाहिराती यांची पडताळणी करुनच पैसे जमा करावेत. तसेच खात्री केल्याशिवाय स्वत: ची वैयक्तिक माहिती देवू नये. असा कोणताही प्रकार लक्षात आल्यास जवळचे पोलीस ठाणे किंवा सायबर सेल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हि कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रुपाली पवार, पोलीस कर्मचारी किरण अब्दागिरे, नवनाथ जाधव, आदेश चलवादी, शितल वानखडे, माधुरी डोके यांच्या पथकाने केली.