‘विनेश’ने हमारा सर ऊँचा कर दिया !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदक प्राप्त केलं आहे. एकीकडे तिचा विजय अत्यंत जल्लोषात साजरा होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. अमिताभ बच्चन यांनीही विनेशचं अभिनंदन केलं आहे. हमें गर्व है भारत की महिलाओं पर, और आज विनेश ने हमारा सर ऊँचा कर दिया ! असं म्हणत विनेशचं कौतूक केलं आहे.

अमिताभ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘आशियाई खेळात सुवर्णपदक जिंकणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. आम्हाला भारतीय महिलांवर गर्व आहे.
[amazon_link asins=’B07DFPG3NH,B019FGRA2U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a73a7019-a50e-11e8-b25f-cb8c4d04214f’]
विनेश फोगाटने अंतिम फेरीत विनेशने जपानच्या युकी आईरीवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. पहिल्या डावात विनेशने असलेल्या जपानच्या आईरीला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा हा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरीही यातून तिने ४ गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. मात्र दुसऱ्या डावात अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट करत सामना जिंकला. याआधी कुस्तीत भारताला बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले होते.