अभिनंदनीय : मुंढवा पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन-
मुंढवा पोलीस ठाण्याला पुण्यातील पहिले आएसअो मानांकन प्राप्त पोलीस ठाणे होण्याचा मान मिळाला आहे.  नुकतेच या पोलीस ठाण्यास आयएसअो मानांकन प्रदान करण्यात आलं आहे. शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर  वेंकटेशम् यांनी अधिकाऱ्यांच्या  पहिल्याच बैठकीमध्ये पोलीस ठाणे व परिसर स्वच्छ ठेवणे. तसेच  पोलिस ठाण्याच्या आवारात नीटनेटकेपणा  व रेकॉर्ड रूम तसेच मुद्देमाल कक्ष व्यवस्थित ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार  मुंढवा पोलीस ठाणे यांनी विशेष प्रयत्न करून मानांकनासाठी आवश्यक असणाऱ्या  105 मुद्द्यांबाबत पूर्तता केली.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’38dec399-a226-11e8-aa8c-b11de081cc7b’]
हे मानांकन पोलीस ठाण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रॅक्टिकल वर्किंग मोबिलिटी सोशल पोलिसिंग तपासाचा दर्जा, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, डॉक्युमेंट अॅण्ड रेकॉर्ड किपिंग, इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम, क्वॉलिटी मॅनेजमेंट सिस्टीम अशा विविध पैलूंचा एकूण एकशे पाच मुद्द्यांना  विचारात घेवून  पूर्व प्रादेशिक  विभागाचे अपर पोलिस आयुक्त श्री सुनील फुलारी सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं आहे.

मानांकन प्रदान करतेवेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 चे प्रकाश गायकवाड, वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर, भारत फोर्डचे संचालक डाॅक्टर संतोष भावे, एचआर मॅनेजर ए. बी. शहा, तसेच मुंढवा परिसरातील लोकप्रतिनीधीसह अनेक नागरिक उपस्थित होते.