काँग्रेसचे ‘मैं ही तो हिंदुस्तान हूं’ प्रचारगीत वादाच्या भोवऱ्यात

धनबाद : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकींचा प्रचाराची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यात आहे. प्रत्येक पक्षांनी प्रचारासाठी प्रचारगीत जाहिरातींचा वापर केला आहे. मात्र आता काँग्रेसचे प्रचारगीत वादाच्या भोवाऱ्यात अडकले आहे. ‘मैं ही तो हिंदुस्ताना हूं’ असे काँग्रेसचे प्रचारगीत आहे, तसं ते सर्वत्र दिसून येत आहे. धनबादच्या निवृत्त कर्नलच्या पत्नीने या गीतावर आक्षेप घेत कॉपीराईटचा आरोप केला आहे. गीताचे बोल आपल्या पतीच्या कवितेतील असल्याचा दावा या महिलेने केला आहे. या महिलेने यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्रही लिहिले आहे.

कर्नल जे के सिंह निवृत्त झाले आहेत. त्यांनी ‘मैं सारा हिंदुस्तान हूं’ हा कविता संग्रह लिहीला होता. १३ एप्रिल २०१२ मध्ये जालियनवाला बागेत त्याचे प्रकाशनही करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसचे प्रचारगीत याच कविता संग्रहातून प्रेरित आहे. तसंच हा कॉपी राईटचा प्रकार आहे. जर कांग्रेसला हे गीत पुढेही दाखवायचे असल्यास त्यांनी आपले संमतीपत्र घ्यावे. या बदल्यात आम्हाला पैसे नकोत. पण काँग्रेस पक्षाने झारखंडच्या कोणत्याही शहीद सैनिक किंवा पोलिसाच्या परिवाराला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नीतिका सिंह यांनी या पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, नुकतेच २५ फेब्रुवारीला झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उद्घाटनावेळी त्यांनी हे गीत नॅशनल स्टेडियमवर जमलेल्या २० हजार माजी सैनिकांसमक्ष म्हटले होते. कर्नल जे के सिंह हे भारतीय सेनेचे प्रसिद्ध उद्घोषक आहेत. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारणही झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या प्रचारगीतावर आक्षेप घेतला आहे.