‘सुधारीत मोटरवाहन कायद्या’च्या विरोधात गडकरींच्या घराबाहेर निदर्शनं, पोलिसावर ‘स्कूटर’ फेकली (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारचा नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना देशात अनेक ठिकाणी वाहन चालकांकडून सुधारीत कायद्यानुसार दंडाची आकारणी करण्यात येत आहे. या विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. याचवेळी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने स्कूटर उटलून पोलिसांच्या दिशेने फेकली.

दिल्लीमध्ये सुधारित मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. पण यामुळे वाहन चालकांकडून जबर दंड वसुल करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी देखील याला विरोध केला आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस कर्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घराबाहेर निदर्शनं केली. त्यावेळी संतप्त कार्यकर्त्याने स्कूटर उचलून पोलिसांच्या दिशेने फेकल्याने एकच गोंधळ उडाला.

दिल्ली बरोबरच गुजरात, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांत नवीन मोटरवाहन कायद्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली आहे. नागरिकांचा क्रोध आणि विरोध पाहता गुजरात सरकारने दंड कमी करण्याची घोषणा केली आहे. 1 सप्टेंबर पासून नवा मोटरवाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहनचालकांना भुर्दंड बसत आहे. गुजरातमध्ये तर एका दुचाकीस्वाराला 56 हजार रुपयांचा दंड बसला. तर एका ट्रकचालकालाही 41 हजार 700 रुपयांचा दंड झाला होता.

 

You might also like