‘हे’ माजी मुख्यमंत्री आता काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, मध्यंतरी माजी मुख्यमंत्री आणि गांधी परिवाराच्या जवळचे सुशीलकुमार शिंदे यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, आता अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार जोपर्यंत नव्या अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्य़ंत गांधी परिवाराचे निकटवर्तीय मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष असतील. मोतीलाल व्होरा हे ९१ वर्षाचे असून त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची जबादारी सांभाळली आहे. नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीपर्यंत व्होरा यांच्याकडे पक्षाची धुरा राहील, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मोतीलाल व्होरा यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशचे राज्यपाल पद तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पद सांभाळले आहे. व्होरा हे युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या खास मर्जीतले नेते, अशी त्यांची काँग्रेसमध्ये ओळख आहे. पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयामध्ये व्होरा यांचा सहभाग असतो. राज्यसभा सदस्य असलेले मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पहात आहेत.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती