Congress | राज्यातील ‘त्या’ फुटीर काँग्रेस आमदारांवर कारवाई ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Elections) काँग्रेसला (Congress) जबर धक्का बसला होता. भाजपाने (BJP) काँग्रेसचे 3 आमदार फोडल्याने काँग्रेसचे (Congress) पहिल्या पसंतीचे उमेदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला होता. हक्काची मते फुटल्याने या प्रकाराची हायकमांडने गंभीर दखल घेतली होती. या संदर्भातील अहवाल तातडीने तयार करून पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आता हा अहवाल दिल्लीत हायकमांडकडे पाठवण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणार्‍या त्या काँग्रेस आमदारांवर काँग्रेस पक्ष कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी भाजपाने 3 उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीतून भाजपाने माघार घेण्यासाठी मविआ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट देखील घेतली होती. परंतु मविआने त्यांचा 1 उमेदवार मागे घ्यावा त्या बदल्यात विधान परिषदेत भाजपा अतिरिक्त उमेदवार देणार नाही अशी ऑफर भाजपाने दिली. ही बोलणी फिस्कटल्याने विधान परिषद निवडणुकीत भाजपाने संख्याबळ कमी असतानाही 5 उमेदवार उभे केले.

 

तसेच विधान परिषदेसाठी मविआने काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचे (NCP) 2 आणि शिवसेनेचे (Shivsena) 2 उमेदवार उभे केले.
या निवडणुकीत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मते फुटली.
काँग्रेसच्या 2 उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.
काँग्रेस पक्षाची हक्काची मते फुटल्याने पक्षश्रेष्ठींनी या संदर्भातील अहवाल मागितला होता.
आता हा अहवाल तयार होऊन तो दिल्लीला पाठवला आहे.

आता विधान परिषदेत भाजपाला मतदान करणार्‍या आमदारांची यादी पक्षश्रेष्ठींना देण्यात आली असून या आमदारांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील (Maharashtra) 1, मराठवाड्यातील (Marathwada) 2 – 3 आणि मुंबईतील (Mumbai) 2 आमदार आहेत.
या आमदारांनी विधान परिषदेत भाजपाला मतदान केले होते.
त्यामुळे विधान परिषदेत भाजपाचे प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा विजय झाला होता.

 

काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे या निवडणुकीत पराभूत झाले.
काँग्रेसला 44 पैकी 41 पहिल्या पसंतीची मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसची 3 मते फुटल्याची माहिती उघड झाली.
काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. पण भाई जगताप (Bhai Jagtap) विजयी झाले.
तसेच भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले आणि चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.

 

Web Title : – Congress | action against those congress mlas in maharashtra who vote to bjp in vidhan parishad election a list sent to party president sonia gandhi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा