स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची ‘विटंबना’, सोलापूरात ‘पडसाद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचं काँग्रेसी कनेक्शन उघड झालं आहे. सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणारा अक्षय लाकडा हा एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा दिल्ली विद्यापीठ शाखा अध्यक्ष आहे. त्याने आपल्या ट्विटरवर सावरकरांच्या विटंबनेचं समर्थन केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दिल्ली विद्यापीठातील कला शाखेच्या विभागाबाहेर नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंह आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुतळे बसवले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख शक्ती सिंह यांच्या पुढाकाराने हे पुतळे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठात तणावाचा वातावरण होतं.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवला जाऊ शकत नाही. असा आक्षेप NSUI ने घेतला आहे. NSUIच्या राष्ट्रीय प्रभारी असलेल्या रुची यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत सावरकर यांना गद्दार असं विशेषण लावत स्वातंत्र्यवीरांची बदनामी केली आहे. समाज माध्यमांवर हे ट्विट व्हायरल होत असून सावरकर प्रेमी त्याविरोधात मोठ्या संख्येने प्रतिक्रिया देत आहेत.

सोलापूरात पडसाद
या घटनेचे पडसाद सोलापूरमध्ये उमटले आहेत. सावकरप्रेमी कार्यकर्त्यांकडून सोलापूरातील काँग्रेस भवनासमोर निषेध करून NSUI च्या पोस्टरवर काळी शाई फेकली. यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, स्वातंत्रवीर सावरकरांचा विजय असो एनएसयूआय मुर्दाबादच्या घोषणा दिल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like