‘तो’ आरोप ‘खोटा’, काँग्रेसनं पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसकडून भाजपकडून फोडाफोडासाठी आमच्या आमदारांना संपर्क केल्याच्या आरोप केला आहे त्यावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की काँग्रेस नेत्यांनी आमदार खरेदी विक्रीचे जे आरोप लावले आहेत ते सर्व खोटे आहेत. आपल्यात आमदारांवर अशी शंका घेणे योग्य नाही. असे काही पुरावे असल्यास काँग्रेसच्या नेत्यांनी पुढील 48 तासात हे पुरावे सादर करावेत.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की भाजप कोणत्याही पक्षाच्या आमदाराच्या संपर्कात नाही. असे काही पुरावे असतील तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते सादर करावे अन्यथा राज्यातील जनतेची आणि आपल्याच आमदारांनी माफी मागावी. यावेळी सुधीर मुनगंटीवार वर्षा बंगल्यावर आले होते.

कोणत्याही पक्षाचे आमदार फोडावे अशी आमची भूमिका नाही. भाजप विचारांच्या लढाईसाठी आग्रही आहे. भाजप नेत्यांनी कोणत्याही पक्षांंच्या आमदाराला संपर्क केला नाही. तसे पुरावे असल्यास फोन रेकॉर्डिंग सादर करावेत असे देखील मुनगंटीवार म्हणाले.

भाजपचे आमदार तर फुटणारच नाहीत. त्यांनी कोणीही खरेदी करु शकत नाहीत, मग कोणताही माय का लाल असेल असे देखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच संपेल. वेट अ‍ॅन वॉचच्या भूमिकेत आपण असल्याचे देखील मुनगंटीवार म्हणाले. चर्चेतून तोडगा निघेल आणि भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेल असा दावा देखील मुनगंटीवार यांनी केला.

Visit : Policenama.com 

You might also like