कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना २ पंतप्रधान हवे आहेत

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना देशात दोन पंतप्रधान हवे आहेत. एक दिल्लीत आणि एक जम्मू काश्मीरमध्ये. कॉंग्रेस जम्मू काश्मीर मधून अफस्पाचा कायदा रद्द करणार आहे. आपले सैनिक दहशतवाद्यांसमोर हतबल झाले पाहिजेत ही कॉंग्रेसची भुमीका आहे. असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी नांदेड येथील प्रचार सभेत केला.

ओमर अब्दूला खुलेआम म्हतायत की देशात दोन प्रधानमंत्री असले पाहिजे. कॉंग्रेस पाकिस्तानकडून पैसे घेऊन देशात फुटीरता निर्माण करणाऱ्यांशी बोलू इच्छित आहे. कॉंग्रेस भारताचे तुकडे करण्यापासून वाचविणारा कायदा हटविण्याचे काम करत आहे.  असे ते म्हणाले.
२०१४ मध्ये आपल्या एका मताने सर्वांना पिंजऱ्यात उभे केले. २०१९ मध्ये आपले १ मत त्यांना त्या ठिकाणी पोहोचवेल. कॉंग्रसचे कारनामे दर पीढीला सारखेच आहेत. भ्रष्टाचाराचाच त्यांचा वारसा आहे. अशाच कारनाम्यांमुळे कॉंग्रेस फक्त ४४ जागा जिंकू शकली. ५ वर्षानंतरही जनतेमध्ये कॉंग्रेसविरोधात राग थोडा सुद्धा कमी झाला नाही. कॉंग्रेसने अफरातफरी माजली आहे.  असं ते म्हणाले.

Loading...
You might also like