राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाबद्दल सुशिलकुमार शिंदेंचे मोठे वक्तव्य

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष मोठ्या अडचणीतून जात आहेत. पक्षाचे अस्तित्व टिकवणं आणि वाढवणं हा त्यांच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. भविष्यात दोन्ही काँग्रेस एकत्र येवू शकतात असे शिंदे यांनी म्हटले आहे.

आमच्या दोघांचीही विचारसरणी एकच आहे. त्यामुळे एकत्र येण्यास अडचण येणार नाही. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येवू शकतात. आता तेही थकलेत, आम्हीही म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस देखील थकले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत. आमच्या मनात खंत आहे. शरद पवारांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्याही मनात खंत असेल मात्र ते बोलून दाखवत नाहीत. मात्र वेळ आल्यानंतर ते बोलून दाखवतील असे शिंदे यांनी म्हटले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी हे मोठे वक्तव्य केले. सरकारवर निशाणा साधताना, मागील पाच वर्षात सरकारने सर्वसामान्यांचे हित जपले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना केंद्राने निर्यात बंदी केली हेच का सरकारचे शेतकऱ्यांवरील प्रेम असा टोला लगावला.

Visit : Policenama.com