तौफीक शेख यांच्या मृत्यूस काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते जबाबदार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – तौसीफ शेख यांच्या मृत्यूस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जबाबदार आहेत. त्यांनीच दावलमालिकची जागा नोटरी दस्ताऐवज करून लाटली आहे, असा आरोप कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परीषदेमध्ये केला आहे. तसेच त्याचे पुरावेही पत्रकारपरिषदेत दाखविले.

राऊत म्हणाले कि, घडलेली घटना आतिशय वाईट आणि मनाला दु:ख देणारी आहे. मात्र, विरोधकांनी तौसीफ यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याची गरज नव्हती. दावलमलीकची जागा नोटरी करून बेकायदेशीर आरोप करणार्यांनी बळकावली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे नगरसेवक डाॅ संदीप बरबडे यांच्या कूटूबांतील विजया श्रीराम बरबडे, दामोदर अडसूळ, आनंदाराव तोरडमल, विशाल अशोक शिंदे, सचिन मुळे यांनी नोटरी करून दावलमलीकच्या बेकायदेशीर जागा खरेदी केल्या आहेत. काँग्रेसचे नगरसेवक सचिन घुले हे अनेक खरेदी व्यवहारामध्ये केलेल्या रोटरीमध्ये साक्षीदार आहेत.

काँग्रेसचे नेते कैलास शेवाळे यांचे भावाने या ट्रस्टच्या जागेमध्ये बांधकाम केले आहे. तर मोनाली तोटे यांचे पतीने बांधकाम केले आहे आणि आता ते दुस-याच्या नावावर दाखवले आहे. शिवाय सरकारी जागेवर मुस्लीम समाजाने शादीखाना नावाने इमारत बांधली आहे. तिथे काँग्रेस नगरसेविका मोनाली तोटे यांचे पतीने खाजगी पतसंस्था सुरू केली आहे. हे सर्व बेकायदेशीर असून आम्ही या बाबत गटविकास आधिकारी आणि नगरसेविका मोनाली तोटे यांना नोटिस दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

 तौसीफ शेख यांनी संपुर्ण दावल मलीक ट्रस्टची जी 40 ते 45 एकर जागा आहे. यावरील बेकायदेशीर व्यवहार आणि आतिक्रमन या बाबत आंदोलन उभा केले होते आणि या सर्व जागामध्ये हे नेते मंडळी सहभागी आहेत. त्यांच्यामुळेच तौसीफचा बळी गेला आहे. त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. असे असताना काल दिवसभर ही मंडळी तौसीफ यांचे मृत्यूचे राजकारण करीत होते. मुस्लीम बांधवाना भडकावत होते.

नगरपंचायतीवर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असल्याने पालकमंत्री आणि सर्व पचांयतीचे पदाधिकारी आणि भाजपचे नगरसेवक यांचेवर बेछूट आरोप करीत होते. त्यांनी आता जाहीर माफी मागावी आणि एका अल्पसंख्याक युवकाच्या मृत्यूस हे सर्व जबाबदार आहेत. फोळके यांनी जिल्हाअध्यक्ष पदाचा राजीनामा दयावयाचा कि त्यांच्या पक्षाने त्यांचेवर काय कारवाई करायची याचा निर्णय  त्यांनी घ्यावा.