काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं वेगळं लढावं का ? कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता दोन्ही पक्षात पराभवाची कारणे शोधण्यासाठी चिंतन बैठका सुरु आहेत. काँग्रेसनं घेतलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सूर निघाला. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने वेगळे लढावे असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यावर अजित पवार यांनी स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नाही. एकत्रच राहील पाहिजे त्यातच दोघांचंही भलं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, ‘काँग्रेसने काय चर्चा करावी हा काँग्रेसचा विषय आहे. पण बैठकीनंतर असेच लोक बोलतात की जे कुठे नगरपालिकेमध्येही निवडून येणार नाहीत. स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नाही. आम्ही काँग्रेसला मदत केली हे त्यांच्या निवडून आलेल्या खासदारांना विचारा. आघाडी करण्यातच दोघांचंही भलं आहे.’

लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे एकमेकांविरोधात नाराजी आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे. शिवसेना – भाजपने विधानसभेसाठी देखील युतीची घोषणा केलेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसच्या आघाडीबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.