काँग्रेसनं नाशिक मध्य आणि शिर्डीमधून दिले उमेदवार

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने आत्‍तापर्यंत उमेदवारांच्या 4 वेळा याद्या घोषित केल्या आहेत. गुरूवारी रात्री देखील एक यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर आज (शुक्रवार) नाशिक मध्य आणि शिर्डी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे काँग्रेसनं घोषित केली आहेत.

नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून हेमलता निनाद पाटील तर अहमदनगर जिल्हयातील शिर्डी विधानसभा मतदार संघातून सुरेश जगन्‍नाथ थोरात यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी राहिलेल्या जागेवर उमेदवार घोषित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांची आघाडी असल्याने दोन-चार जागांवरील उमेदवारांबाबत अदलाबदली होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर नाशिक मध्य आणि शिर्डी येथील उमेदवारांची घोषणा काँग्रेसनं केली आहे.