विधानसभा 2019 : काँग्रेसकडून 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांसह 15 दिग्गजांचा समावेश

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – पितृपक्ष संपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि आम आदमी पक्षानं यापुर्वीच त्यांच्या उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून आजच (रविवार) मुंबई बाहेरील जवळपास सर्वच उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. काँग्रेसने देखील 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, डॉ. विश्‍वजीत कदम, अमित विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्यासह काही माजी मंत्र्यांचा समवेश आहे.


काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या उमेदवारांची नावे आणि त्यापुढील कंसात मतदार संघ पुढील प्रमाणे –
1. अ‍ॅड. के.सी. पडावी (अक्‍कलकुवा)
2. पद्माकर विजयसिंह वळवी (शाहदा)
3. शिरीष स्वरूपसिंह एच. नाईक (नवापूर)
4. शिरीष मधुकरराव चौधरी (रावेर)
5. हर्षवर्धन वसंतराव सपकाळ (बुलढाणा)
6. अनंत सखाराम वानखेडे (मेहकर)
7. अमित सुभाषराव झनक (रिसोड)
8. विरेंद्र वाल्मिकराव जगताप (धामणगाव रेल्वे)
9. अ‍ॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (तिओसा)
10. अमर शरद काळे (आर्वी)
11. रणजीत प्रताप कांबळे (देवळी )
12. सुनिल छत्रपाल केदार (सावनेर)
13. डॉ. नितीन राऊत (नागपूर नॉर्थ)
14. विजय नामदेवराव वडट्टीवार (ब्रम्हपुरी)
15. सतीश मधुकर वारजूरकर (चिमूर)
16. प्रतिभा सुरेश धानोकर (वर्धा)
17. अनिल उर्फ बाळासाहेब मानगुरूकर (यवतमाळ)
18. अशोक शंकरराव चव्हाण (भोकर)
19. डी.पी. सावंत ( नांदेड उत्‍तर)
20. वसंतराव बळवंतराव चव्हाण (नायगाव)
21. रावसाहेब जयवंत अनंतपूरकर (देगलूर)
22. संतोष कौतुका तारिफ (कळमनुरी)
23. सुरेश अंबादास वरपुडकर (पार्थी)
24. डॉ. कल्याण वैजीनाथ काळे (फुलंब्री)
25. शेख असिफ शेख रशिद (मालेगाव मध्य)
26. रोहित चंद्रकांत साल्वे (अमरनाथ)
27. सय्यद मुज्जफर हुसेन (मिरा भाईंदर)
28. सुरेश हिराचंद्र कोपरकर (भांडूप वेस्ट)
29. अशोक भाऊ जाधव (अंधेरी वेस्ट)
30. मोहम्मद आरिफ नसीम खान (चांदिवली)
31. चंद्रकांत दामोदर हांडोरे (चेम्बुर)
32. झिसान जियाऊद्दीन सिद्दीकी (बांद्रा पुर्व)
33. वर्षा एकनाथ गायकवाड (धारावी)
34. गणेश कुमार यादव (सायन – कोळीवाडा)
35. अमिन अमिरअली पटेल (मुंम्बादेवी)
36. अशोक अर्जुनराव जगताप (कुलाबा)
37. माणिक मोतीराम जगताप (महाड)
38. संजय चंद्रकांत जगताप (पुरंदर)
39. संग्राम अनंतराव थोपटे (भोर)
40. रमेश आनंदराव बागवे (पुणे कॅन्टोन्मेंट)
41. बाळासाहेब थोरात (संगमनेर)
42. अमित विलासराव देशमुख (लातूर)
43. अशोक शिवाजीराव पाटील – निलंगेकर (निलंगा)
44. बसवराज माधवराव पाटील (औसा)
45. मधुकरराव देवराम चव्हाण (तुळजापूर)
46. प्रणिती सुशिलकुमार शिंदे (सोलापूर मध्य)
47. मौलाबी बासुमियाँ सय्यद (सोलापूर दक्षिण)
48. ऋतुराज संजय पाटील (कोल्हापूर दक्षिण)
49. पी.एन. पाटील साडोळीकर (करवीर)
50. डॉ. विश्‍वजीत पतंगराव कदम (पलूस-केडगाव)
51. विक्रम बाळासाहेब सावंत (जत)

Visit : Policenama.com