‘न्याय योजना’ लागू केल्यास देश 4 पावलं मागे

नवी दिल्ली : वृ्त्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी घोषणा केलेली न्याय योजना लागू झाल्यास देश 4 पाऊले मागे पडेल असे वक्तव्य निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. शिवाय, राहुल गांधी यांनी कुठलाही न विचार करता न्याय योजनेची घोषणा केली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर या योजनेचा गंभीर परिणाम होईल. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस काहीही घोषणा करतंय असे म्हणत राजीव कुमार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

राहुल गांधींच्या न्याय योजनेच्या घोषणेनंतर निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर या मुद्द्यावरून टीका केली आहे. राजीव कुमार म्हणाले की, “निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडून काहीही घोषणा करण्यात येत आहेत. काँग्रेसकडून हा जुनाच पॅटर्न राबविण्यात येत आहे. देशातील गरिबी ही 1966 सालीच दूर करण्याची घोषणा केली होती. तसेच वन रँक वन पेंशनची अंमलबजावणी काँग्रेसच्या नंतरच झाली. त्यामुळे निवडणुकांचा मुद्दा बनविण्यासाठी काँग्रेसने ही घोषणा केली आहे.” असे राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर, “राहुल गांधींची ही योजना म्हणजे लोकांना काम न करण्यास प्रोत्साहीत करणारी ठरेल” असेही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेही राहुल गांधींच्या योजनेची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसच्या या योजनेमुळे देशाचे आर्थिक गणित बिघडेल किंवा सराकारला महत्त्वाच्या खर्चात कपात करावी लागले. पण, सद्यस्थितीत या दोन्ही बाबी शक्य नसल्याचे आर्थिक सल्लागार परिषदेने म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल(सोमवार दि 25 मार्च) पत्रकार परिषद घेत न्याय योजनेची घोषणा केली. देशात जर काँग्रेसचे सरकार आले तर देशातील गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये मिळतील. ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न 12 हजारापेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील 20 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना याचा लाभ मिळेल आणि देशातील गरिबी यामुळे नष्ट होईल असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like