राज ठाकरेंची ‘भूमिका’ ED च्या कारवाईमुळे बदलली, ‘या’ काँग्रेस नेत्याचा ‘खोचक’ टोला

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सीसीए कायद्यासाठी केंद्र सरकारला माझे समर्थन असल्याचे सांगितल्यानंतर आता त्यांच्या भूमिकेवर महाविकासआघाडीतील नेत्यांकडून विविध मते व्यक्त करण्यात येत आहेत. राज ठाकरेंवर ईडीच्या कारवाईचा परिणाम झाला अशी खोचक टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

राज ठाकरेंनी हिंदूत्वाची कास पकडल्यानंतर आणि भगवा, राजमुद्रा असलेला झेंडा सादर केल्यानंतर यावर आपेक्ष घेताना सचिन सावंत म्हणाले की मनसेची भूमिका कायम बदलत आली आहे. पहिले मराठी, मग गुजराती प्रेम, मग पंतप्रधान मोदींना विरोधात आणि आता हिंदुत्वाचा अजेंडा. राज ठाकरेंवर मध्यंतरी जी ईडीची कारवाई झाली त्याचा परिणाम म्हणून राज ठाकरेंची आपली भूमिका बदलली.

यावेळी बोलताना सचिन सावंत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास देखील विरोध केला. यावर बोलताना सचिन सावंत म्हणाले की सावरकरांच्या नावे केंद्र सरकारने एकही योजना काढली नाही. त्यांना श्यामा प्रसाद, पंडित दिनदयाल उपाध्याय आठवतात. सावरकरांचा मुद्दा फक्त राजकारणासाठी उपस्थित केला जातो, परंतु त्यांना सावरकरांना भारतरत्न द्यायचे असेल तर त्यांनी ते द्यावे. आमचा विरोध हा तात्विक आहे. सावरकरांना आहे, सावरकरांनी केलेल्या वक्तव्यांना आहे आणि या विचारांना राजमान्यता मिळू नये अशी आमची भूमिका आहे.

फेसबुक पेज लाईक करा –