काँग्रेसचे दिग्गज नेते संजय राऊतांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लीलावती रुग्णालयात त्यांची भेट घेतली.

कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यात जवळीक वाढू लागली आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी खासदार राऊत यांची भेट घेणे महत्वाचे मानले जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितल्यानंतर दोन्ही पक्षातील घडामोडी वाढल्या आहेत. सत्ता स्थापनेत शिवसेनेच्या बाजूने संजय राऊत केंद्रस्थानी आहेत. दोन दिवसांपूर्वी ते रुग्णालयात दाखल झाले, त्यानंतरही त्यांनी सेनेची बाजू मिडीयासमोर मांडण्याचे काम चालू ठेवले आहे.

Visit : Policenama.com