काँग्रेसचा इंदापूरमधील ‘बुरुज’ ढासळला, हर्षवर्धन पाटलांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) – काँग्रेसचा इंदापूरमधील बुरुज ढासळला असून हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 3 वाजता ते पक्षप्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अखेर त्यांचा पक्षप्रवेश ठरला असून ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील. 4सेप्टेंबर रोजी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली होती तसेच कार्यकर्त्यांशीही संवादही साधला होता.

या कारणामुळे करणार भाजप प्रवेश –

इंदापूर मतदारसंघात आघाडीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केली होती. मात्र राष्ट्रवादीकडून त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नाही. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. इंदापूर मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –