पुण्यात काँग्रेसची प्रचार फेरी ठरली आणि रद्दही झाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस पक्षाचा पुण्याचा लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरला नाही, तरीही पक्षाने प्रचाराची सुरुवात करण्याचे ठरविले आणि नंतर प्रचारफेरी रद्द केली.

काँग्रेस पक्षाच्यावतीने आज दुपारी चार वाजता ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरापासून प्रचाराची सुरुवात केली जाणार होती. कार्यकर्त्यांना निरोपही पाठविण्यात आले मात्र हा कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात आले. ही सभा ठरली आणि रद्दही झाली या दोन्हीबाबत पक्षाकडून काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. उमेदवारीचा घोळ चालूच आहे तसाच घोळ या प्रचारसभेबाबतही झाला.

उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यावर पद्धतशीर नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल असे एका नेत्याने सांगितले.

दरम्यान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीची घोषणा सकाळी साडेदहा वाजता अधिकृतपणे करण्यात आली. मात्र पुण्याचा निर्णय झाला नसल्याने काँग्रेस नेते, कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.

हेही वाचा – Loksabha 2019 : पुण्यात उमेदवाराविना काँग्रेस आज प्रचाराचा नारळ फोडणार