आदित्य ठाकरेच्या विरोधात काँग्रेसची ‘खेळी’, विरोधात उतरवणार ‘हा’ नेता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चाबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे घरातील आदित्य ठाकरे हे पहिले व्यक्ती आहेत जे निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस तगडा उमेदवार उतरवणार असल्याची माहिती आहे. आदित्य यांच्या विरोधात डॉ. सुरेश माने यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. बसपा अध्यक्षा मायावती यांचे साथीदार डॉ. सुरेश माने यांनी बीआरएसपी हा पक्ष स्थापन केला होता. ते विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेससह आघाडी करण्याच्या तयारीत आहेत.

आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवावी असा पुनरूच्चार शुक्रवारी वरळी विधानसभा मतदारसंघातील गटप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला. आदित्य ठाकरे देखील जनआशिर्वादच्या माध्यमातून राज्यातचा दौरा करत आहेत. त्यांच्यासाठी मुंबईतील सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. आदित्य यांनी सेनेकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे.

‘आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावं’, अशी मागणी देखील शिवसेनेच्या गटप्रमुखांनी केली आहे. यावर आमदार अनिल परब यांनी शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर ते असे ही म्हणाले की विधानसभेला जो वरळीतील उमेदवार असेल तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार, आणि ते आदित्य ठाकरे आहेत.

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा ‘ए’ प्लस मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी येथूनच विधानसभा निवडणूक लढवावी असे मत अनिल परब यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. त्यानंतर आगामी विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेशही त्यांनी वरळीतील शिवसैनिकांना देण्यात आले आहेत. याआधी देखील आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

Visit – policenama.com