विधानसभा 2019 : काँग्रेसचे 57 उमेदवार ठरले, 8 संभाव्य उमेदवारांची यादी समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभेसाठी काँग्रेसने छाननी समितीची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत राज्यातील 57 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ गटनेते के. सी. पाडवी, कार्याध्यक्ष विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

काँग्रेसने या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. यांनतर 10 तारखेला छाननी समितीची पुन्हा बैठक होत असून, त्यात आणखी 30 ते 40 उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. छाननी समितीने निश्चित केलेल्या उमेदवारांच्या यादीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीकडून मंजुरी मिळाल्यावरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. त्यापैकी काही जणांनी यावेळी भाजपात प्रवेश केला आहे तर अजून काही जण भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like