काँग्रेसकडून आणखी 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा, शेवटच्या क्षणी आणखी एक उमेदवार बदलला

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसकडून आज (शुक्रवारी) आणखी 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या जागांबाबात खुप विचार करण्यात आला. शेवटी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रसेने जवळपास सर्वच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. बंडखोरीच्या शक्यतेमुळं काही जागांवरील उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. दरम्यान, काँग्रेसकडून शेवटच्या क्षणी कुडाळ येथील उमेदवार बदलण्यात आला आहे.

काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांचे मतदार संघ आणि नावे –
1. नांदेड दक्षिण – मोहनराव मारूतीराव हंबरडे
2. मुखेड – भाऊसाहेब खुशालराव पाटील
3. पालघर – योगेश शंकर नम
4. भिवंडी (ईस्ट) – संतोष मंजाय्या शेट्टी
5. कुडाळ – चेतन नामदेव मोंडेकर (हेमंत राघोबा कुडाळकर यांना बदलले)