काँग्रेसने काही तासातच ‘या’ दोन मतदार संघातील उमेदवार बदलले ?

औरंगााबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला होता. ‘मला लोकांमध्ये जाऊन नशीब अजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,’ असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली होती. त्यानंतर काही तासातच काँग्रेसने औरंगाबाद आणि जालन्यातील उमेदवार बदलले असल्याची एक यादी प्रकाशीत झाली. मात्र, कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ती यादी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्यापही औरंगाबाद आणि जालना येथील उमेदवारीबाबत संभ्रम आहे. तर कॉंग्रेसने जालना आणि औरंगाबादच्या उमेदवारांमध्ये बदल केला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading...
You might also like