PM मोदींनी ‘हेडलाईन’ दिली देशाला ‘हेल्पलाईन’ची गरज : कॉग्रेस

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 20 लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा केली. 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती येणार आहे. मात्रा, मोदींच्या भाषणानंतर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. घराकडे परतणार्‍या मजुरांच्या सद्य परिस्थितीबाबत मोदी बोलले नाहीत. यावरुन काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदीजी, तुम्ही तुमच्या भाषणातून देशातील मीडियाला वृत्त छापण्यासाठी ‘ मीडिया’ दिली, पण देशाला अद्यापही मदतीच्या ‘हेल्पलाइन’ची गरज आहे. असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी लगावला आहे.

लॉकडाउन कालावधीत घरी परतणार्‍या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचे आहे तुम्ही त्याबाबत काही घोषणा कराल अशी अपेक्षा होती पण, देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर व श्रमिकांप्रति आपल्या निष्ठुरता आणि असंवेदनशीलतेमुळे निराश आहोतअशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे. जाहीर केलेले आर्थिक पॅकेज सत्यात उतरण्याची वाट पाहात असल्याचे त्यांनी सांगिेतले.

देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 20 लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा मोदी यांनी केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असे मोदींनी स्पष्ट केले. कोरोनाच्या आपत्तीनंतर केंद्राने, तसेच रिझव्र्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केलेल्या मदतीचाही ‘आत्मनिर्भर भारत मदत योजने’त समावेश असेल. हा मदतनिधी देताना जमीन, रोजगार, रोखता आणि नियम या चारही आर्थिक बाबींचा विचार करण्यात आला आहे.