मोदींच्या ‘मिशन शक्ती’ बाबत ‘ही’ आहे काँग्रेसची प्रतिक्रिया 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने ‘मिशन शक्ती’ अंतर्गत अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे. याबाबतची माहीती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने इस्रो आणि भारत सरकचे अभिनंदन केले आहे. याबाबत काँगेसने ट्विटद्वारे भारतीय अंतराळ विज्ञान संसंस्थेचे अभिनंदन केले. याबरोबरच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाची आठवण करून द्यायला ही काँग्रेस विसरले नाही.

त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “भारताने केलेल्या नव्या कामगिरीबाबत आम्ही इस्त्रोचे आणि सरकारचे अभिनंदन करीत आहोत. १९६१ साली माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि भारतीय भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था यांच्या वतीने भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाची स्थापना करण्यात आली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला चालना दिली. इंदिरा गांधी यांनी प्रत्येक वेळेला याबाबत भारताचा गौरव केला आहे”. अशा आशयाचे ट्विट काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच

अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. भारताने अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे “मिशन शक्ती” असे या मिशनचे नाव आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतला. सॅटेलाईट पाडणारा भारत चौथा देश  ठरला आहे. जगातील तीन देश अमेरिका रशिया आणि चीन या देशांच्या पंक्तीत आता भारत जाऊन बसला आहे. या मिसाईल द्वारे फक्त तीन मिनिटात सफलतापूर्वक हे ऑपरेशन पूर्ण केले गेले. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

आगामी लोकसभा तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठीक ११ वाजून २३ मिनिटांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देशवासियांसाठी महत्वाचा संदेश देण्याबाबत ट्विट केले. यापूर्वी नोटबंदी जाहीर करताना देखील नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे ट्विट केले होते. मात्र आता ऐन निवडणुका तोंडावर असताना नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते तर माध्यमांमध्ये याबाबत तर्क वितर्क सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठीक सकाळी 11:45 ते 12.00 च्या दरम्यान देशाला संबोधित करणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर दिली. याचे थेट प्रक्षेपण ट्विव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे करण्यात आले.

वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “प्रत्येक भारतीयसाठी यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नसेल काही वेळापूर्वी आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळात स्पेसमध्ये या मिसाईलची चाचणी केली. ‘मिशन शक्ती’ हे अत्यंत कठीण ऑपरेशन होते त्याच्यासाठी अत्यंत कठीण क्षमतेचे आवश्यकता होती. वैज्ञानिकांनी सगळे उद्देश प्राप्त केले आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही मोठ्या अभिमानाची बाब आहे.

Loading...
You might also like