‘नागरिकत्व’ विधेयक : काँग्रेसकडून BJP सरकारची तुलना ‘ब्रिटिश’ शासनाबरोबर, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज लोकसभेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. परंतू या विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होताना दिसत आहे. काँग्रेस आणि टीएमसीकडून हे विधेयक असंविधानिक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसकडून भाजपची तुलना थेट ब्रिटिश शासनाबरोबर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून ट्विट करत भाजपने आज सादर केलेले नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

आज भाजपने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडले. काँग्रेस, टीएमसीसह इतर विरोधी पक्षांनी नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेकाला विरोध केला आणि हे विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप केला. या विरोधानंतर विधेयक सादर करण्यासाठी लोकसभेत मतदान पार पडले. यात विधेयकाच्या बाजूने 293 मत आणि विरोधात 82 मत मिळाले. सोमवारी संसदेत एकूण 375 जणांनी मतदान केले.

परंतू यानंतर काँग्रेसकडून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला. भाजपची तुलना भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांबरोबर करण्यात आली. ब्रिटिशांकडून भारतीय जनतेवर करण्यात आलेले अत्याचार भाजपकडून करण्यात येत असल्याची टीका काँग्रेसकडून ट्विटमधून करण्यात आली. भाजप शासन म्हणजेच ब्रिटिश सरकार असे काँग्रेसकडून म्हणण्यात आले. यात ब्रिटिशांकडून भारतात कसे राज्य करण्यात आली याची तुलना भाजपशी करण्यात आली.

ट्विटमध्ये काँग्रेसने लिहिले आहे की भाजप आणि ब्रिटिश शासनात कोणताही फरक नाही. फोडा आणि राज्य करा, भारताला लुटणे, कोणत्याही आरोपाशिवाय तुरुगांत टाकणे, हिंसेला प्रोत्साहन या मुद्यावर यात भाष्य करण्यात आले. यात #विभाजक भाजपपासून देश वाचवा वापरण्यात आला.

Visit : Policenama.com