काॅंग्रेसने स्वप्नात सर्जिकल स्ट्राईक केल्या : शहनवाज हुसेन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काॅंग्रेसने स्वप्नात सर्जिकल स्ट्राईक केल्या आहेत, अशी टिका भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांनी खरच सर्जिकल स्ट्राईक केल्या असतील त्याच्या तारखा सांगाव्यात असे आव्हान हि त्यांनी दिले.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी हुसेन पुण्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काॅंग्रेसवर जोरदार टिका केली.” भाजप सत्तेत आल्यानंतर देशातील मुस्लिम अधिक सुरक्षित झाला आहे. आर्थिक निकषानुसार देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा फायदा मुस्लिम समाजाला होणार आहे. आतापर्यंत मुस्लिमांची आर्थिक स्थिती काॅंग्रेसमुळेच सुधारली नाही. त्यांचा व्होट बैंक म्हणूनच वापर केला.मुस्लिमांची मने भाजपने जिंकली आहे” असे त्यांनी नमूद केले.

देशातील जनतेने मोदी यांना परत पंतप्रधान करण्याचा निर्धार केला आहे असा दावा करित हुसेन यांनी काल पुण्यात राहुल गांधी यांनी मोदीविषयी केलेल्या वक्तव्यावर मत मांडले. “काॅंग्रेस हा सर्वात जुना पक्ष असुन या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मर्यादा सोडून बोलत आहे. मोदि आणि भाजपच्या जेष्ठ नेत्यांविषयी बोलताना त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. गळाभेट घ्यायची मग डोळा मारयचा, मोदींवर प्रेम आहे असे प्रकार ते करित आहे”.

भाजपमधील जेष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली गेल्या विषयी ते म्हणाले,” आघाडी मुळे भाजपला चारशे उमेदवार उभे करता येणार आहे. उमेदवारी अनेकांना मिळत नाही. उमेदवारी दिली नाही म्हणजे अडवाणी, महाजन आदिंचा आम्ही सन्मान करित नाही असे होत नाही. त्या सर्व जेष्ठ नेत्यामुळेच आम्ही सत्तेत आलो. काॅंग्रेसने सिताराम केसरी, पी.व्ही.नरसिंह राव यांना काय वागणूक दिली हे सर्वांना माहीत आहे.

मोदिंना विरोध करणार्यांना आम्ही देशद्रोही म्हणत नाही असे स्पष्ट करताना हुसेन यांनी लष्कराच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुरस्कार द्यायचा का ? भारत के तुकडे होंगे असे म्हणार्यांना काय म्हणायचे ?” असे प्रश्न उपस्थित केले. पुरस्कार वापसी करणारे आणि. भाजपला मते देऊ नका असे सांगणाऱ्यांचे देशातील मतदार ऐकणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 72 हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करणारे काॅंग्रेसने जाहिरनाम्यात जाहीर केलेली 72 हजार रुपये देण्याची घोषणा फसवी असल्याचे नमूद करीत हुसेन यांनी अच्छे दिन आल्याचा दावा केला.

Loading...
You might also like