Congress | अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा नकार! आता ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगणार काँग्रेस अध्यक्षपदाची रस्सीखेच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची (Congress President) निवडणूक जोरदार रंगणार आहे. कारण राहुल गांधींनी (Rahul Gandhi) या पदासाठी त्यांचा नकार सुचवल्यानंतर आता या पदावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान आता काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) आणि केरळ मधील खासदार डॉ. शशी थरूर (MP Dr. Shashi Tharoor) यांच्यात लढत रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता 22 वर्षानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवड निवडणुकीद्वारे ठरवली जाणार आहे.

या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस पक्षाचे (Congress) आदेश मानण्याचे स्वीकारले आहे. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले की, काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांना विराजमान करण्यास पुन्हा एकदा ते प्रयत्न करणार आहेत. तर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी शशी थरूर यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात येऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळवली आहे.
याचबरोबर या निवडणुकीत काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांना
काँग्रेसचे अध्यक्ष पद मिळाले तर राजस्थानचे मुख्यमंत्री पद हे ते कोणाकडे सुपूर्त करतील की दोन्ही पदांचा कारभार
ते स्वतः पाहतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
तर आज केरळमध्ये अशोक गहलोत पोहोचणार असून राहुल गांधी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title :- Congress | congress rahul gandhis refusal now the election of congress president will be fought between these two veteran leaders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bharti Jaffrey Passed Away | अभिनेते अशोक कुमार यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री भारती जाफरी यांचे निधन

Pune Crime | वीज कट केल्याने महावितरणच्या अधिकार्‍याला बेदम मारहाण, केले फ्रॅक्चर