काँग्रेसच्या ‘या’ नगरसेविकेसह अन्य् ५ विरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल

इंदापूर : पाेलीसनामा ऑनलाईन- नगरपरिषदेतील काँग्रेस आय पक्षाच्या विद्यमाण नगरसेविका अनिता रमेश धोत्रे यांचे विरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रेखा परशुराम जाधव ( वय २४ ) रा. वडारगल्ली, इंदापूर.ता. इंदापूर, जि. पूणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत रेखा जाधव यांनी म्हटले आहे की, आम्हांला दोन वर्षांपूर्वी पैशाची आर्थिक अडचण असल्याने आमचे शेजारी राहणारे अनिता रमेश धोत्रे यांचे कडून शेकडा २० रुपये टक्क्याने एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. सदरचा व्यवहार हा मनीषा अण्णाराव अनंतकर व तानाजी धोंडिबा देवकर या दोघांच्या मध्यस्थिने झाला होता. व आम्ही एक लाख रुपये घेतले होते.सदर रकमे पैकी मुद्दल व व्याज मिळून ऐंशी (८०) हजार रुपये अनिता धोत्रे यांना परत केले होते.

तरीपण त्यांची बहीण मनिषा अण्णाराव अनंतकर (चौगुले), तसेच अनिता धोत्रे यांचे पती रमेश धोत्रे व त्यांची दोन मुले तुषार रमेश धोत्रे व कुणाल रमेश धोत्रे असे सर्वजन मिळुन आमचे घरी आले. त्यावेळेस मी घरी एकटीच होते. मी एकटीच घरी असल्याचे पाहुन वरील सर्वजनांनी मला दमदाटी व शिविगाळ करत मुद्दल एक लाख रूपये व व्याजाचे बारा लाख रूपयांची मागणी केली. व पैसे नसल्यास तुमची जागा आम्हाला दे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करायला सुरूवात केली.

त्यावर मी त्यांना सांगितले की, मी घरी एकटीच आहे. माझे पती व सासू सासरे आल्यानंतर हा विषय त्यांना सांगा असे म्हटल्याचे नंतर त्यांनी मला परत शिवीगाळ करत हाताने लाथाबुक्यांनी पाचही जनांनीे मारहाण करायला सुरवात केली. ही घटना दि. २८ आॅक्टोंबर २०१८ रोजी सकाळी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमाराची होती. थोड्या वेळानंतर माझी सासु आमचे घराजवळ आली. सासु वयस्कर असताना तीलाही या लोकांनी शिवीगाळ द्यायला सुरूवात केली. व दमदाटी करुन हाताने मारहाण करायला सुरवात केली.

सदरचे भांडणे सोडविण्यासाठी माझी नणंद जनाबाई शंकर जाधव तसेच माझ्या दोन नंदा नामे सारिका गुजाळ व मनिषा देवकर या आल्या असता यांनाही, आरोपी अनिता रमेश धोत्रे, रमेश धोत्रे , तुषार रमेश धोत्रे, कुणाल रमेश धोत्रे, मनिषा अन्नाराव अनंतकर(चौगुले) यांनी मारहाण करित आमचे कोणी काय वाकडं करणार नाही. तुम्हीं गुमान एक लाखाचे बारा लाख रुपये द्या नाही तर तुमची जमीन आम्हांला द्या. असे बोलुन धमकावत होते.

आम्ही तुम्हाला ८० हजार रुपये दिले असताना १२ लाख रुपये कशाचे मागता, असे म्हणाल्यावर मी त्यांना औषध पिते म्हणाल्याचे नंतर रमेश धोत्रे याने तु कशाला औषध पिते आम्ही तुला औषध पाजतो असे म्हणाले व ते सर्वजण तेथुन निघुन गेले. त्यांच्या या
सावकारी दांडेलशाहीला कंटाळून घाबरुन मी घरातील ठेवलेले फिनाईल लिक्वीड स्वतः प्राशन केले असुन याला जबाबदार वरील सर्वजन आहेत.असे फिर्यादीत म्हटले आहे.

रेखा यांचे पती यांनी रेखा जाधव यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर उपजील्हा रूग्णांलयात नेवुन दाखल केले.असुन रेखा जाधव यांचेवर उपचार चालु असल्याचे फिर्यादीत म्हटले. रेखा जाधव यांनी आरोपी १) अनिता रमेश धोत्रे २) रमेश धोत्रे ३) तुषार रमेश धोत्रे ४) कुणाल रमेश धोत्रे ५) मनिषा अन्नाराव अनंतकर(चौगुले) सर्व रा.बाबा चौक वडारगल्ली ता. इंदापूर जि. पुणे यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.