‘ए, तू शानी बन…’, काँग्रेस नगरसेवकाची तरुणीवर ‘दादागिरी’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत चव्हाण हे या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांनी एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केले आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हा वाद उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या व्हिडिओमध्ये विक्रांत चव्हाण हे ‘ए, तू शानी बन’ असं अर्वाच्च भाषेत बोलून महिला पत्रकाराच्या हातातला मोबाईल त्यांनी झिडकारला असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला असून ही धक्कादायक घटना घाटकोपर मेट्रो स्थानकावरील आहे.

दरम्यान विक्रांत चव्हाण यांची दादागिरी महिला पत्रकाराने व्हिडिओच्या माध्यमातून ट्विटर वर शेअर करत झालेला प्रकार उघडकीस आणला आहे. झालेला प्रकार असा की, बुधवारी दुपारी महिला पत्रकार घाटकोपर रेल्वे स्थानकावर कामावर जाण्याकरिता निघाली होती. त्या दरम्यानच मेट्रो स्थानकावर एक व्यक्ती कर्मचाऱ्यावर जोरजोरात ओरडत होती. म्हणून महिला पत्रकारानं तिकडे धाव घेतली आणि झालेला प्रकार जाणून घेण्याबाबत पुढे सरसावली. तेव्हा ओरडणारी व्यक्ती मी नगरसेवक विक्रांत चव्हाण असल्याचं जोरजोरात त्या कर्मचाऱ्यास सांगत होती. त्या दरम्यानच महिला पत्रकारानं त्याचा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विक्रांत चव्हाण यांनी महिला पत्रकारास म्हटले की “तू जा में विक्रांत चव्हाण हू काॅर्पोरेटर” असं सांगून आरडाओरड केला. आणि महिलेचा फोन झिडकारत अपमानास्पद वागणूक दिली.

मेट्रो स्थानकावर नेमकं काय घडलं?
दरम्यान नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी याबाबत आपली बाजू मांडताना म्हटले की, ट्रॅफिक असल्याने घाटकोपर मेट्रो स्थानकावरून अंधेरी येथील वर्सोवा येथे मी माझ्या कुटुंबियांसह जाण्याचे ठरविले. कालच आम्ही धीरुभाई अंबानी रुग्णालयात एकाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी निघालो होतो. तेव्हा वर्सोवा येथून परतत असताना घाटकोपर मेट्रो स्थानकावर मेट्रोकडून देण्यात येणारा कॉईन अडकला. त्यामुळे याबाबतीत मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी माझ्याकडे रिटर्न तिकीट असल्याचे विचारले, त्यावर मी ते दिले आणि त्यांना मी नगरसेवक असल्याने तुम्ही माझ्याशी असे वागलात, सर्वसामान्य लोकांशी तुम्ही कसे वागाल? असा जाब विचारला आणि सर्वसामान्यांसाठी मदत कक्ष असायला पाहिजे असे मी सांगत होतो आणि नेमक्या त्याच वेळी एक मुलगी येते आणि माझा व्हिडीओ शूट करते.

त्यावेळी मी तिला चार वेळा मॅडम, डोन्ट फॉलोव्ह मी, डोन्ट शूट माय व्हिडीओ अशी विनंती केली. परंतु तिने काही एक न ऐकता माझ्या चेहऱ्यासमोर येऊन माझा व्हिडीओ शूट केला. म्हणून मी व्हिडीओ शूट करत असताना चाल शानी बन असं बोलून तिचा मोबाईल झिडकारला. तसेच ते म्हणाले की माझा व्हिडीओ शूट करण्याचा अधिकार त्या तरुणीस कोणी दिला असं म्हणत इंटरव्हलनंतर चित्रपट पाहून चित्रपट खराब आहे असं बोलण्यापेक्षा पूर्ण चित्रपट पाहावा आणि मग बोलावं असं ते म्हणाले.

दरम्यान या तरुणीनं व्हिडीओ एडिट करून इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. यातून माझी छबी खराब करण्याचा तिचा हेतू आहे. त्याविरोधात मी आयपीसी ४९९ अन्वये गुन्हा दाखल करणार आहे असे देखील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/