काँग्रेस नगरसेवकाने चक्क हुक्का पार्लरमध्ये घेतली बैठक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नागपूरमधील युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांनी चक्क हुक्का पार्लरमध्ये बैठक घेतली. यामुळे ही बैठक वादग्रस्त ठरली आहे. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके हे हुक्का पार्लरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb3b93ef-b7d4-11e8-abd9-3597b5620543′]

राजनगर येथील विंड अ‍ॅण्ड वुड्स रेस्टॉरेंट पहाटे २ वाजतापर्यंत सुरू असून तेथे हुक्का पार्लरही सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरणे यांनी साथीदारांसह विंड अ‍ॅण्ड वुड्स या रेस्टॉरंटवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना नगरसेवक बंटी शेळके व त्यांचे २० कार्यकर्ते दिसले. तर काही कार्यकर्ते चक्क हुक्का पित होते. यामध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्याचा भाऊही होता. शेळके यांना बघताच भरणे व पोलिस कर्मचाऱ्यांना धक्का बसला. काँग्रेस नेत्यांसह शेळके यांनीही हुक्का पार्लर विरोधात आंदोलन केले होते, याची माहिती पोलिसांनी भरणे यांना दिली.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5767202-b7d4-11e8-a00e-7140b5a33c3b’]

या रेस्टॉरंटवरील छाप्यात दहा अल्पवयीन मुलेही काम करताना आढळून आली आहेत. पोलिसांनी पार्लरचे संचालक रवींद्रसिंग रनधक यांच्याविरुद्ध कारवाई केली. रेस्टॉरेंटमध्ये हुक्का पार्लरशिवाय आणखी कोणते अवैध धंदे सुरू होते, याची तपासणी करण्यासाठी पोलिस येथील सीसीटीव्ही फुटेजही तपासणार आहेत. दरम्यान, अंबाझरीतील हवेली रेस्टॉरेंट व हुक्का पार्लरही उशिरा रात्रीपर्यंत सुरू असल्याची माहिती भरणे व त्यांच्या पथकाला मिळाली असता त्यांनी हवेलीमध्येही छापा टाकला. येथेही पोलिसांना अल्पवयीन मुले आढळून आली. पोलिसांनी या प्रकरणी प्रेम दिलीप जोरनकर व सुमित साहेबराव गोपाळे यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.