स्मृती इराणींच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या काळात ना खायाल अन्न आहे ना रोजगार आहे . मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचाही बट्ट्याबोळ केला आहे . असे म्हणत कांग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधत बोचरी टीका केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस तसेच राहुल आणि प्रियंका यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत काँग्रेसने भाजपावर पलटवार केला आहे. ७० वर्षात संस्थागत भ्रष्टाचार ही देशाला कॉंग्रेसची देण आहे. मागील २४ तासात वेगवेगळ्या माध्यमांनी जनतेसमोर ठेवलेल्या तथ्यांवरून गांधी-वाड्रा परिवाराकडून फॅमीली पॅकेज भ्रष्टाचार सुरु असल्याचं वास्तव समोर आलं आहे. असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यावर स्मृती इराणी गंभीर आरोप केले होते.

आज(बुधवार दि 13 मार्च) रणदीप सुरजेवाला हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी स्मृती इराणींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पत्रकारांशी बोलताना रणदीप सुरजेवाला म्हणाले की, “मोदी सरकारने देशातील लाखो रोजगार नष्ट केले आहेत. मोदी सरकारच्या काळात न खायला आहे ना रोजगार आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला आहे.” इतकेच नाही तर, 2018मध्येही भाजपाने 110 लाख नोकऱ्या नष्ट केल्या आहेत असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

काय म्हणाल्या होत्या स्मृती इराणी ? – स्मृती इराणी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या त्यावेळी त्यांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेसवर निशाणा साधताना म्हणाल्या की, ” ७० वर्षात संस्थागत भ्रष्टाचार ही देशाला कॉंग्रेसची देण आहे. मागील २४ तासात वेगवेगळ्या माध्यमांनी जनतेसमोर ठेवलेल्या तथ्यांवरून गांधी वाड्रा परिवाराकडून फॅमीली पॅकेज भ्रष्टाचार सुरु असल्याचं वास्तव समोर आलं आहे. राहूल गांधी डिफेन्सच्या व्यवहारात एवढी रुची घेण्यात देशहित नसून कौटुंबिक हितसंबंध आहेत.” असे घणाघाती आरोप स्मृती इराणी यांनी केले होते. संजय भंडारी, एच. एल. पाहवा यांच्यासोबत जीजा-साला यांचा काय संबंध आहे. याचे उत्तर राहूल गांधींनी देशाला द्यावे असे आवाहनही त्यांनी केले ह

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like