‘वादा कुछ और किया था और डिलीव्हरी कुछ और’ : मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. ‘पहले की सरकार में ‘वादा कुछ और किया था और डिलीव्हरी कुछ और होती थी’ असे वक्तव्य  मोदींनी केले आहे. इतकेच नाही तर आम्ही चार वर्षांत १ कोटी २५ लाख लोकांना घरे दिली. हे जर त्यांना करायचं असलं असतं तर त्यांच्या दोन पिढ्या गेल्या असत्या असे वक्तव्य करत मोदी यांनी नाव न घेता काँग्रेसला टोला लगावला.
आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. इतकेच नाही तर  नवी मुंबईत सिडकोतर्फे उभारल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील ९० हजार घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.
दरम्यान यावेळी बोलताना मोदी यांनी त्यांच्या काळात सुरु केलेल्या अनेक याेजनांची माहिती देत आपण किती कमी वेळात किती कामं पूर्ण केली याचा आढावा सांगितला. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँगेसवर नाव न घेता निशाणा साधला.
यावेळी बोलताना त्यांनी मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करणार असल्याचंही सांगितलं. मोदी म्हणाले की, “आम्ही चार वर्षात अनेक मेट्रो प्रकल्प सुरू केले.” २०२२ ते २०२४ या दरम्यान तब्बल पावणे तीनशे किमीचे मेट्रोचे जाळे मुंबईत पसरवणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिलं. मुख्य म्हणजे पहिल्या सराकरच्या काळात,  ‘वादा कुछ और किया था और डिलीव्हरी कुछ और होती थी’ असं वक्तव्यही मोदींनी केलं.
पुढे ते असेही म्हणाले की, “आम्ही चार वर्षांत १ कोटी २५ लाख लोकांना घरे दिली. हे जर त्यांना करायचं असलं असतं तर त्यांच्या दोन पिढ्या गेल्या असत्या असे वक्तव्य करत मोदी यांनी नाव न घेता काँग्रेसला टोला लगावला. इतकेच नाही तर, सर्वांना आपलं हक्काचं घर मिळावं यासाठी ९० हजार घरे निर्मितीचे ध्येय हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ३ वर्षांत घराचे काम पूर्ण होणार असेही ते म्हणाले. तर गेल्या ७ ते ८ महिन्यात घर खरेदीदारांच्या संख्येत वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
कल्याण पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय मंत्री,राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.
एकंदर १७ स्थानके असणाऱ्या या मेट्रोचा भिवंडीतील कोनगाव येथे डेपो प्रस्तावित आहे. कल्याण कृषी बाजार समिती ते कापूरबावडी असा हा २४.५ किमीचा मार्ग आहे. यासाठी ८ हजार ४१७ कोटी खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ९ हा मार्ग दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर असा १० किमीचा असून या मार्गात ८ एलिव्हेटेड स्थानके असतील. यासाठी ६ हजार ६०७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्ष २०२२मध्ये तो पूर्ण होणे अपेक्षित आहे.
You might also like