काँग्रेस नेते राशिद अल्वी यांच्या ऐवजी अमरोहामधून सचिन चौधरी

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्‍ते राशिद अल्वी यांना उत्‍तरप्रदेशच्या अमरोहामधून उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. मात्र, ती आता रद्द करण्यात आली असुन त्यांच्या ऐवजी सचिन चौधरी यांना उमेदवारी देणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी स्पष्ट केले आहे.

अमरोहा येथुन उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर राशिद अल्वी हे नाराज असल्याच्या बातम्या मिडीयामध्ये आल्या होत्या. काँग्रेसने जाहिर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे राशिद अल्वी हे नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्याबाबत पक्ष श्रेष्ठींनी तात्काळ दखल घेतली आणि उत्‍तरप्रदेशातील अमरोहा येथुन राशिद अल्वी यांच्या ऐवजी सचिन चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली. राशिद अल्वी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले असुन ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.

You might also like