गुजरात : पोलीसनामा ऑनलाईन – आज मोदींचा बालेकिल्ला गुजरातमध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सभा घेतली. यासभेत प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठकही गुजरातमध्ये पार पडली. संघ आणि भाजपा या दोन्हींच्या विचारधारेला हरवायचं आहे, असा संकल्प या बैठकीत करण्यात आला.
भाजपा आणि संघाचे राजकारण आणि त्यांची विचारधारा द्वेष पसरवणारी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला या विचाराधारेचाच पराभव करायचा आहे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला.
विशेष म्हणजे गुजरामध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक एक दोन नाही तब्बल ५८ वर्षांनी पार पडते आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी या बैठकीसाठी हजर आहेत.
दरम्यान, गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते हजर आहेत. तसंच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर झालेल्या रॅलीत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्यावर टीका केली.
Ahmedabad: Congress Working Committee meeting at Sardar Patel Smarak concludes. #Gujarat pic.twitter.com/WGGigsOJxR
— ANI (@ANI) March 12, 2019
ह्याहि बातम्या वाचा –
#GST : १ एप्रिल पासून घरे स्वस्त होणार, ‘इतक्या’ लाखांचा होणार फायदा
पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्यानेच मारला ३१ लाखांवर डल्ला
‘ऑन ड्युटी नाकाबंदी’वर असलेल्या पोलिसाला वाहनाने उडवले
सुजय विखेंचं खासदारकीचं तिकीट मुख्यमंत्र्यांकडून ‘कन्फर्म’