काँग्रेसच्या बैठकीला वादळी रुप, ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं दिली राजीनाम्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. परंतु या बैठकीला आता वादळी स्वरुप प्राप्त झाले आहे. भाजपला मदत करण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नवी आझाद यांनी तर थेट राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. काही नेते भाजपला मदत करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विरोधीपक्षा सोबत लढत असताना काही काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र का लिहिलं. काही नेते हे भाजपला मदत करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भर बैठकीत पक्षाला इशारा दिला.

गुलाम नबी आझाद म्हणाले, भाजपला मदत करण्याचे सिद्ध झाले तर पदाचा राजीनामा देईन, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे बैठकीत एकच खळबळ उडाली. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून चांगलेच वादंग उठले आहे. सोनिया गांधी यांची जर इच्छा नसेल तर राहुल गांधी यांनी समोर यावं अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे काही काँग्रेसचे नेते सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपद स्विकारावे असे बोलून दाखवत आहेत.