काँग्रेसच्या 10 मंत्र्यांची यादी जाहीर, प्रणिती शिंदेंना स्थान नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी अंतिम झाली असून त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रणिती शिंदे यांना बाहेर ठेवण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रविवारी रात्री काँग्रेसच्या १० मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केली. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख या ८ जणांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात येत आहे. सतेज ऊर्फ बंटी पाटील, डॉ़ विश्वजित कदम, यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश केला जाणार आहे.

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची मंत्रीपदी निवड व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात होते. तसेच रिपाई कवाडे गटाचे योगेंद्र कवाडे यांनी आपला समावेश केला जावा, अशी मागणी केली होती़ मात्र, त्यांना काँग्रेसने स्थान दिले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/