Loksabha : काँग्रेसने चंद्रपुरचा उमेदवार बदलला ; हिंगोलीसह ४ उमेदवारांची घोषणा

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी देशातील १० उमेदवारांची यादी आज (रविवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जाहिर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, कॉग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला असून पुर्वी उमेदवारी दिलेल्या विनायक बंगाडे यांचा पत्‍ता कट करण्यात आला असून सुरेश धानोरकर यांना चंद्रपूरमधुन उमेदवारी दिली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघातून अद्यापही उमेदवारी जाहिर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. लवकरच पुण्यातील उमेदवाराची घोषणा करण्यात येईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेसने आज (रविवारी) जाहिर केलेल्या महाराष्ट्रातील ४ उमेदवारांची नावे आणि त्यापुढे मतदार संघाचे नाव पुढील प्रमाणे :

अकोला : हिदायत पटेल
रामटेक : किशोर उत्‍तमराव गजभिये
चंद्रपूर : सुरेश धानोरकर
हिंगोली : सुभाष वानखेडे