अखेर काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी ‘या’ निष्ठावान माजी आमदाराला उमेदवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सर्वच लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची घोषणा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. पुणे लोकसभा मतदार संघ हा सुरवातीपासुनच चर्चेत आहे तो भाजप आणि काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार म्हणुन. भाजपने शुक्रवारी (दि.२२) मध्यरात्रीनंतर गिरीश बापट यांना उमेदवारी जाहिर केली. त्यानंतर काँग्रेसपुढील पेच वाढला. प्रविण गायकवाड, अरविंद शिंदे, मोहन जोशी की आणखी कोण बाजी मारणार अशी चर्चा असतानाच आज काँग्रेसकडून माजी आमदार आणि प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांना पुण्यातुन उमेदवारी देण्यात आली.

मोहन जोशी यांचा दांडगा जनसंपर्क , निवडुन येण्याची क्षमता आणि पक्ष निष्ठा यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. आता गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यात पुण्याचा सामना रंगणार आहे. राज्यातील जवळपास सर्वच मतदार संघातील उमेदवारांची घोषणा झालेली आहे. मात्र, पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. अखेर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी जाहिर केली आहे. सध्यातरी भाजपच्या गिरीश बापट यांचे पारडे जड असले तरी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी हे त्यांना कडवी झुंज देतील आणि विजयश्री खेचुन आणतील अशी चर्चा काँग्रेस वर्तुळामध्ये आहे.