गोव्यात काँग्रेसची राष्ट्रपती राजवटीची मागणी

पणजी : वृत्तसंस्था

गोव्यात मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्री गैरहजर असल्या कारणाने राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मागील सहा महिन्यांपासून राज्यातील प्रशासन व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती शासनाची गरज आहे, त्यासाठी आम्ही राज्यपाल मृदुला सिन्हा यांची वेळ मागितली आहे, असे गोवा काँग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी म्हटले आहे .

जाहिरात

पर्रिकर सध्या उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. गोव्याचे ऊर्जा मंत्री पांडुरंग मडकाईकर आणि शहर विकास मंत्री फ्रान्सिस डिसुजा हेही आजारी आहेत. हे सर्वजण राज्यात कधीपर्यंत परतणार याबाबत काहीही निश्चितता नाही . राज्य सध्या संवैधानिक संकटाचा सामना करत आहे.प्रकृती अस्वास्थामुळे पर्रिकर सातत्याने अनुपस्थित असतात. त्यांनी आपला कार्य प्रभारही दुसऱ्यांकडे सोपवलेला नाही. डिसुजा  हेही मागील महिन्यात उपचारासाठी अमेरिकेत गेले होते. तर मडकाईकर यांच्यावरही ५ जूनपासून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री व प्रमुख मंत्री सातत्याने गैरहजर असल्या कारणाने काँग्रेसने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

धक्कादायक…. टक्कल पडण्याच्या भीतीने मुलीची आत्महत्या

जाहिरात