मोदी येताच काँग्रेसची आगळी वेगळी बॅनरबाजी

स्वतःला चौकीदार म्हणून घ्यायला लाज कशी वाटत नाही

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन -(माधव मेकेवाड) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडमधून लोकसभेच्या मैदानात आहेत. त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजप-सेना रिपाईच्या युतीकडून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. सोबत मुस्लिम उमेदवार समाजवादी पार्टी व बसपा युती कडून अब्दुल समद अब्दुल करीम व वंचित बहुजन आघाडी व एम.आय.एम युतीचे उमेदवार प्रा.डॉ.यशपाल भिंगे हे आहेत. भाजपा कडून अति परिचित असलेले प्रताप चिखलीकर आहेत. भाजपा सेना रिपाई च्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी आज नांदेड येथे येणार आहेत.

नांदेड हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. कारण गेली अनेक वर्षे काँग्रेस कडे सत्ता आहे. तेथूनच विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना खरे तर आपली पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र, पक्षश्रेष्ठीच्या दबावाखातर त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप भाजपने केला होता. नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने मत विभागणी होईल लोकांचे मन परिवर्तन होईल म्हणून काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी नरेंद्र मोदी येण्यापूर्वी नांदेड शहरात आगळी वेगळी पोस्टर बाजी केलेली दिसून आली आहे. शिवाजी नगर कडून उदानपुलावर येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या बिल्डिंग वर मोठी मोठी पोस्टर जाहिरात लावलेली दिसले आहे ह्या पोस्टर कडे नरेंद्र मोदी रस्त्याने येतील त्यावेळी लक्ष पडेल म्हणून अशोक चव्हाण यांनी ही पोस्टर लावलेली खेळी केल्याचे चर्चेला उत आला आहे.

आज नांदेड शहरात मोदी यांची ऐतिहासिक सभा होणार असल्याचे चित्र सभेसाठी आलेल्या लोकांची गर्दी पाहून वाटत आहे. तर दुसरी कडे हार होण्याच्या भीतीने काँग्रेस कडून मोदीसरकारची मागील केलेली शून्य कामगिरी चे पोस्टर लावलेले आढळून आले आहे.