Congress Digital Membership | डिजिटल सभासद नोंदणीला प्रतिसाद कार्यकर्त्याचा उत्साह वाढला; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 30 तारखेला पुण्यात घेणार आढावा – माजी आ. मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Congress Digital Membership | समाजाच्या सर्व थरातून कॉंग्रेस पक्षाच्या डिजीटल सभासद नोंदणीला प्रतिसाद मिळू लागल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढला आहे, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी सांगितले. (Congress Digital Membership)

पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा लोकसंपर्क वाढावा, पक्षाची ध्येयधोरणे लोकांना सांगावीत अशा उद्देशाने पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी डिजिटल सभासद नोंदणीची मोहीम (Congress Digital Membership) राबविण्याचा आदेश दिला. त्यानुसार देशभरात सभासद नोंदणी मोहीम दि. ३१ मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे. पुणे शहरातही सर्व पेठा आणि उपनगरांमध्ये पक्षाचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांच्या नेतृत्वाखाली सक्रीय झाले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) दि. ३० मार्च रोजी पुणे शहराला भेट देणार असून सभासद नोंदणीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

महागाई, पेट्रोल -डिझेल दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) , बेरोजगारी (Unemployment) या कारणाने केंद्रातील मोदी सरकारविषयी जनतेत रोष आहे किंबहुना मोदी सरकारबद्दल (Modi Government) नैराश्याची भावना आहे, असे सभासद नोंदणीच्यावेळी लोकांशी संपर्क साधताना आढळले आणि लोकांना काँग्रेस हाच योग्य पर्याय वाटत आहे. त्यामुळे तरुणवर्ग, गरीबवर्ग काँग्रेसचा सभासद होत आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

web title : Congress Digital Membership | Response to digital member registration increased activist enthusiasm; State President Nana Patole to take review in Pune on 30th March – Former MLA. Mohan Joshi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा