राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम ; काँग्रेसने बरखास्त केल्या सर्व राज्यांच्या प्रदेश समित्या

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस समोरील समस्या वाढतच चालल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आणि राहुल गांधी राजीनाम्यावर अजूनही ठाम आहेत. याच दरम्यान आता काँग्रेसने सर्व राज्यातील काँग्रेस प्रदेश समित्या बरखास्त केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक झाली. त्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा असे काँग्रेसच्या नेत्यांनी सुचवून देखील काँग्रेस अध्यक्ष राजीनाम्यावर ठाम राहिले. प्रियंका गांधी यांनादेखील यामध्ये घेऊ नका अशी विनंती त्यांनी केली. राहुल गांधी यांनी एक महिन्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहण्याची तयारी दाखवली असली तरी आतापर्यंत झालेल्या काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीत राहुल गांधी सहभागी झाले नाहीत. मोठ्या निर्णयापासून ते दूरच राहिले.

निवडणुकीतील अपयश
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या लोकसभा निवडणुकीत केवळ ५२ जागांवर यश मिळाले. २०१४ पेक्षा फक्त ८ जागा काँग्रेसला जास्त मिळाल्या आहेत. त्यामुळे यावेळेस देखील काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदापासून वंचित रहावे लागले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा कोणताही परिणाम लोकसभेच्या निकालावर झाल्याचे दिसून आले नाही.

काँग्रेस कार्यकारिणीकडून पुन्हा एकदा राहुल गांधी यांची मनधरणी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्ष पदासाठी संभाव्य नावे अंतिम केले आहेत. काँग्रेस कार्यकारिणी समितीकडून शेवटचा प्रयत्न म्हणून राहुल गांधी यांची मनधरणी केली जाणार नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव सगळ्यात आघाडीवर आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग