दिल्लीत ‘काॅंग्रेस’ला उमेदवारांची ‘चणचण’, सोनिया गांधींच्या आदेशानंतरही दिग्गजांची ‘माघार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने आपल्या ७० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते हे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे चित्र दिसत आहे तर भाजपाच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे, असे सूत्रांच्या माहितीनुसार समजत आहे. या दोन्ही नेत्यांना सोनिया गांधींनी आदेश दिल्यानंतरही त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय माकन आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी हे ती दोन दिग्गज नेते आहेत.

दिल्लीच्या २०१५ च्या विधानसभा निवडणुकीबद्दल विचार केला तर आप ने एकहाती सध्या काबीज केली होती.  विशेष म्हणजे काँग्रेसला आपले खाते देखील उघडता आले नव्हते. त्यावेळी दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. त्यामुळेच आम आदमी पार्टीने ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले होते.

दरम्यान दिल्लीत यावेळी देखील काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत कारण दिग्गज नेते महाबल मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. विनय मिश्रा यांना आपने द्वारका येथून तिकीट दिले आहे. तसेच तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले शोएब इकबाल यांनी देखील आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. त्यामुळे यावेळेस देखील आम आदमी पार्टीचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसला ही निवडणूक मोठी आव्हानात्मक ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like